Aapli Chawdi म्हणजेच आजच्या युगातील डिजिटल नोटीस बोर्ड आपल्या गावाचा संकेतस्थळ. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा जमिनीची खरेदी किंवा विक्री होत असे, तेव्हा तलाठी मार्फत पंधरा दिवसाचे हरकत किंवा आक्षेप नोटीस लावण्यात येत होती. तलाठी कार्यालय मध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये गेल्याशिवाय आपल्याला जमिनीच्या खरेदी विक्रीची माहिती होत नसे. 

महसूल विभाग महाराष्ट्र शासनाने आपली चावडी नावाचे एक पोर्टल निर्माण केले आहे. या पोर्टल मध्ये सातबारा विषयी(7/12), मालमत्ता पत्रक विषयी(Property Card), मोजणी विषयी(Mojni) नोटीस डिजिटल पद्धतीने आपल्या चावडीवर प्रदर्शित करण्यात येते. ही नोटीस प्रदर्शित झाल्याच्या 15 दिवसाच्या आत मध्ये हरकत किंवा आक्षेप असल्यास घेता येतो. 

Aapli chawdi सातबारा विषयी e Chavdi 7 12

Aapli chawdi सातबारा विषयी(e Chavdi 7/12)

जमिनी संबंधित कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाल्यानंतर सातबारा मध्ये नोंद घेणे आवश्यक असते. सातबारा मध्ये नोंद घेण्यासाठी फेरफार होणे महत्त्वाचे असते. खरेदी विक्री कोणत्या प्रकारची झाली? फेरफार कोणत्या प्रकारचा झाला? हे पहा-

 • सर्वप्रथम https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi वेबसाईट पोर्टल ओपन करा. 
 • Aapli Chawdi पोर्टलवर सातबारा विषयी(7/12) रेडिओ बटन सेलेक्ट करा.
 • जिल्हा, तालुका, गाव निवडा.
 • Captcha योग्य पद्धतीने लिहा व आपली चावडी पहा या हिरव्या रंगाच्या बटन वर क्लिक करा.
Aapli chawdi सातबारा विषयी 7 12
 • यानंतर सातबारा विषयी(7/12) सर्व माहिती याठिकाणी दिसेल जसे- 
 1. फेरफार नंबर, 
 2. फेरफार चा प्रकार, (खरेदी, बोजा,हक्क सोड पत्र/ रिलीज डीड, वारस, इतर फेरफार) 
 3. फेरफार चा दिनांक, 
 4. हरकत नोंदविण्याची शेवटची तारीख, (फेरफार दिनांक झाल्यानंतर पंधरा दिवस)
 5. सर्वे नंबर/ गट क्रमांक. 
 • सातबारा विषयी झालेल्या फेरफार संबंधित अधिक माहितीसाठी सर्वात शेवटी असणाऱ्या पहा या बटन वर क्लिक करा. 
 • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 यांच्या कलम 150(2) अन्वये सूचना या ठिकाणी दिसते.
 • या ठिकाणी नोंदीचा प्रकार, लिहून देणार, लिहून घेणार, खरेदी दस्त क्रमांक, खरेदी किंमत सर्व महत्त्वपूर्ण नोंदी दिसतात.

Read Also: महाभुलेख 7/12 उतारा व 8 अ मालमत्ता पत्रक ऑनलाइन पहा

digitalsatbara.mahabhumi.gov.in-aaplichawdi-SatBara-shownotice

 मालमत्ता पत्रक विषयी(Property Card)

 • वरील प्रमाणेच सर्वप्रथम https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi वेबसाईट पोर्टल ओपन करा. 
 • Aapli Chawdi पोर्टलवर मालमत्ता पत्रक विषयी(Property Card) रेडिओ बटन सेलेक्ट करा.
 • विभाग निवडा (कोकण प्रदेश- मुंबई शहर/मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, अमरावती, पुणे, औरंगाबाद)
 • जिल्हा, कार्यालय, गाव/पेठ निवडा.
 • Captcha योग्य पद्धतीने लिहा व आपली चावडी पहा या हिरव्या रंगाच्या बटन वर क्लिक करा.
मालमत्ता पत्रक विषयी(Property Card)
 • यानंतर मालमत्ता पत्रक विषयी(Property Card) सर्व माहिती याठिकाणी दिसेल जसे- 

आवक क्रमांक 

 1. फेरफार नंबर, 
 2. फेरफार चा प्रकार, (खरेदी, गहाण खत अनुसार बोजा चढविणे किंवा उतरविणे, हक्क सोड पत्र/ रिलीज डीड,बक्षीस पत्र, वारस, इतर फेरफार) 
 3. फेरफार चा दिनांक, 
 4. हरकत नोंदविण्याची शेवटची तारीख, (फेरफार दिनांक झाल्यानंतर पंधरा दिवस)
 5. नगर भूमापन क्रमांक. 
 • मालमत्ता पत्रक विषयी(Property Card) झालेल्या फेरफार संबंधित अधिक माहितीसाठी सर्वात शेवटी असणाऱ्या पहा या बटन वर क्लिक करा. 
 • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 यांच्या कलम 150(2) अन्वये सूचना या ठिकाणी दिसते.
 • या ठिकाणी नोंदीचा प्रकार, लिहून देणार, लिहून घेणार, खरेदी दस्त क्रमांक, खरेदी किंमत सर्व महत्त्वपूर्ण नोंदी दिसतात.

Aapli chawdi मोजणी विषयी(Mojni)

 • सर्वप्रथम https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi वेबसाईट पोर्टल ओपन करा. 
 • आपली चावडी पोर्टलवर मोजणी विषयी(Mojni) रेडिओ बटन सेलेक्ट करा.
 • जिल्हा, तालुका, गाव निवडा.
 • Captcha योग्य पद्धतीने लिहा व आपली चावडी पहा या हिरव्या रंगाच्या बटन वर क्लिक करा.
 • यानंतर मोजणी विषयी(Mojni) नोटीस सर्वे नंबर/ गट क्रमांक नुसार या ठिकाणी दिसेल.

Mahabhulekh Maharashtra (7/12 8अ) ऑनलाइन देखें

Digital 7 12 Mahabhumi से डिजिटल स्वाक्षरीत 7/12, 8A, फेरफार, मालमत्ता पत्रक

1 thought on “Aapli Chawdi डिजिटल नोटीस बोर्ड महसूल विभाग महाराष्ट्र शासन ”

 1. मालमत्ता फेरफार नोंद 2018 पर्यंतच आहे. पुढील नोंद नाही. कृपया नोंद घ्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top