Mahabhulekh Nagpur How to get online 7/12 in Nagpur?

महाभूलेख नागपूर महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक (Online Mahabhulekh property card Nagpur) पहा. थोडक्यात https://bhulekh.mahabhumi.gov.in/Nagpur/Home.aspx वेबसाईटवर आपल्या जमिनीचा ऑनलाईन सातबारा बघणे.

🌏 योजनेचे नाव:महाभूलेख नागपूर महाभूमि, bhumi abhilekh Nagpur
🌏 कोणा द्वारे आरंभ झाली:महाराष्ट्र शासन महसूल विभाग
🌏 हितकारक:महाराष्ट्राचे नागरिक, 7/12 online Nagpur District
🌏 योजनेचा उद्देश:भूमि अभिलेख संबंधित माहिती मिळवणे
🌏 अधिकृत वेबसाइट लिंक:bhulekh.mahabhumi.gov.in
महाराष्ट्र भूमी अभिलेख नागपूर 2024

MAHA Bhulekh Nagpur: महाराष्ट्र भूमी अभिलेख नागपूर 

Mahabhulekh Nagpur (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh Maha Abhilekh) महाराष्ट्र राज्याची अशी वेबसाईट आहे जी महाराष्ट्रातील नागरिकांना 7/12 उतारा, 8A उतारा आणि मालमत्ता पत्रक property card ऑनलाइन प्रदान करते. या वेबसाईटवर दर्शविलेली सातबारा, ८अ व मालमत्ता पत्रक संबंधित माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येत नाही. आपल्याला आपल्या जमिनी बद्दल फक्त माहिती करून घ्यायची असेल, तर त्यासाठी तलाठी कार्यालय सज्जा येथे जाण्याची काहीच गरज नाही. आपल्या जमिनी संबंधित माहिती जसे गाव नमुना नंबर 8अ सातबारा उतारा मलमत्ता पत्रक महाभुलेख वेबसाईटवर सहज मिळते. 

गाव नमुना नंबर 7/12 उतारा कसा बघावा?

  • ऑनलाईन विना स्वाक्षरीत Satbara utara पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत महाभुलेख वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
Mahabhulekh Nagpur How to get online 7/12 in Nagpur
  • नागपूर विभाग निवडा. (अमरावती, छत्रपति संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे) 
  • नागपूर विभाग निवडल्यानंतर नागपूर जिल्हा व त्यानंतर तालुका, गाव निवडा. (गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा) (उमरेड, कळमेश्वर, काटोल, कामठी, कुही नागपूर ग्रामीण, नागपूर शहर, नारखेड, पारशिवनी, भिवापुर, मौदा, रामटेक, सावनेर, हिंगणा)
  • सातबारा उताऱ्याचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सर्वे नंबर/ गट नंबर, अक्षरी सर्वे नंबर/ गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव असे पर्याय दिसतात. जर का आपल्याला गावातील एकूण नावे म्हणजे संपूर्ण गावाची यादी पाहायची असेल तर संपूर्ण नाव हा पर्याय निवडा. 
ऑनलाईन विना स्वाक्षरीत सातबारा नागपूर
  • सर्वात सोपा पर्याय सर्वे नंबर/गट नंबर निवडा. 
  • गट नंबर टाईप केल्यानंतर शोधा या बटणावर क्लिक करा. 
  • आपला योग्य गट नंबर निवडा कारण काही गटांमध्ये अ, ब, क किंवा एक, दोन, तीन असे पर्याय असतात.
  • सातबारा उतारा ऑनलाइन नोंदणीसाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर टाईप करा.
  • Captcha तंतोतंत बरोबर टाईप करा व Verify captcha to view 7/12 वर क्लिक करा.
  • गाव नमुना 7 (अधिकार अभिलेख पत्रक) व गाव नमुना 12 (पिकांची नोंदवही) म्हणजेच सातबारा(7/12) आपल्यासमोर आहे.
सातबारा उतारा

Read Also: महाभूलेख महाराष्ट्र (7/12 8अ) ऑनलाइन देखें

  • या वेबसाईटवर दर्शविलेली ऑनलाइन माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.
  • कायदेशीर अथवा शासकीय बाबींसाठी वापरण्यासाठी महाभुलेख सातबारा उतारा महाभुमी वेबसाईट digitalsatbara.mahabhumi.gov.in वर मिळेल. 

8अ उतारा जमाबंदी पत्रक नागपूरऑनलाइन बघा 

  • नागपूर ऑनलाइन 8 अ उतारा पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
https-bhulekh-mahabhumi-gov-in-Nagpur-Home-aspx
  • नागपूर विभाग निवडा  (अमरावती, छत्रपति संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे) 
  • विभाग निवडल्यानंतर नागपूर जिल्हा, तालुका, गाव निवडा.
  • खाता नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव, संपूर्ण नाव यापैकी कोणत्याही एका ची निवड करा.
  • आठ अ नोंदणीसाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर लिहा व 8अ पहा या टॅबवर क्लिक करा.
  • कॅपच्या तंतोतंत बरोबर टाईप करा व Verify captcha to view 8A वर क्लिक करा.
  • गाव नमुना आठ-अ धारण जमिनींची नोंदवही (कृषिक) आसामीवार–खतावणी जमाबंदी पत्रक आपल्यासमोर आहे.
  • या वेबसाईटवर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.
  • कायदेशीर अथवा शासकीय बाबींसाठी वापरण्यासाठी  8 अ उतारा महाभुमी वेबसाईटवर मिळेल. 

मालमत्ता पत्रक नागपूर (Online property card Nagpur) ऑनलाईन पाहणे

  • मालमत्ता पत्रक ऑनलाइन पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
मालमत्ता पत्रक नागपूर
  • Online property card Nagpur साठी विभाग निवडा  (अमरावती, छत्रपति संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे) 
  • नागपूर विभाग निवडल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडा.
  • CTS No. /न. भु.क्र, पहिले नाव, मधील नाव, आडनाव व नाव शोधा यापैकी कोणत्याही एका ची निवड करा.
  • मालमत्ता पत्रक ऑनलाइन पाण्यासाठी आपला मोबाईल नंबर व कॅपच्या टाईप करा.
  • महाराष्ट्र जमीन महसूल( गाव, नगर व शहर भूमापन) नियम, 1969 यातील नियम 7 नमुना “ड” म्हणजेच मालमत्ता पत्रक आपल्यासमोर आहे. 
Online property card Nagpur

महाभुलेख सातबारा उतारा साठी शासकीय वेबसाईट लिंक 

नागपूर विभागातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाची लिंक खालीलप्रमाणे आहेत.

वर्धाhttps://wardha.gov.in/
नागपूरhttps://nagpur.gov.in/mr/
भंडाराhttps://bhandara.gov.in/
गोंदियाhttps://gondia.gov.in/mr/
गडचिरोलीhttps://gadchiroli.gov.in/mr/
चंद्रपूरhttps://chanda.nic.in/mr/service/land-records-7/
नागपूर जिल्हा जुना सातबारा, जुने फेरफार, नोंदवही ऑनलाईन कसे काढावे ?

सर्वप्रथम आपले अभिलेख पोर्टल वर रजिस्ट्रेशन/लॉग इन करा. aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords
बेसिक सर्च या टॅबवर क्लिक करा.नागपूर जिल्हा व आपला तालुका निवडा.
सर्च रिझल्ट मध्ये दस्तावेज Add To Cart करा.
Review Cart मध्ये आपले दस्तावेज डाऊनलोड करा किंवा सेव करून प्रिंट करून घ्या. 

युलपिन क्रमांक (ULPIN) म्हणजे काय? 

युलपिन क्रमांक (ULPIN) म्हणजे Unique Land Parcel Identification Number आपल्या जमिनीचा विशिष्ट ओळख क्रमांक. थोडक्यात आपल्या जमिनीचा आधार क्रमांक.
प्रत्येक जमिनीचा ULPIN क्रमांक ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक वर नमूद केलेला असतो किंवा क्यूआर कोड च्या खाली लिहिलेला असतो.

1 thought on “Mahabhulekh Nagpur How to get online 7/12 in Nagpur?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top