महाभूलेख महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक (Online property card) पहा. थोडक्यात bhulekh.mahabhumi.gov.in वेबसाईटवर आपल्या जमिनीचा ऑनलाईन सातबारा बघणे.
🌏 योजनेचे नाव: | महा भूलेख महाभूमि, Mahabhumi abhilekh, Bhulekh Maharashtra |
🌏 कोणा द्वारे आरंभ झाली: | महाराष्ट्र शासन महसूल विभाग |
🌏 हितकारक: | महाराष्ट्राचे नागरिक |
🌏 योजनेचा उद्देश: | भूमि अभिलेख संबंधित माहिती मिळवणे |
🌏 अधिकृत वेबसाइट लिंक: | bhulekh.mahabhumi.gov.in |
MAHA Bhulekh: महाराष्ट्र भूमी अभिलेख 2023
MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh Maha Abhilekh) महाराष्ट्र राज्याची अशी वेबसाईट आहे जी महाराष्ट्रातील नागरिकांना 7/12 उतारा, 8A उतारा आणि मालमत्ता पत्रक property card ऑनलाइन प्रदान करते. या वेबसाईटवर दर्शविलेली सातबारा, ८अ व मालमत्ता पत्रक संबंधित माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येत नाही. आपल्याला आपल्या जमिनी बद्दल फक्त माहिती करून घ्यायची असेल, तर त्यासाठी तलाठी कार्यालय सज्जा येथे जाण्याची काहीच गरज नाही. आपल्या जमिनी संबंधित माहिती जसे गाव नमुना नंबर 8अ सातबारा उतारा मलमत्ता पत्रक महाभुलेख वेबसाईटवर सहज मिळते.
गाव नमुना नंबर 7/12 उतारा कसा बघावा?
- ऑनलाईन विना स्वाक्षरीत सातबारा उतारा पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत महाभुलेख वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
- विभाग निवडा. (अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे)
- ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा.
- जिल्हा निवडल्यानंतर तालुका, गाव निवडा.
- सातबारा उताऱ्याचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सर्वे नंबर/ गट नंबर, अक्षरी सर्वे नंबर/ गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव असे पर्याय दिसतात. जर का आपल्याला गावातील एकूण नावे म्हणजे संपूर्ण गावाची यादी पाहायची असेल तर संपूर्ण नाव हा पर्याय निवडा.
- सर्वात सोपा पर्याय सर्वे नंबर/गट नंबर निवडा.
- गट नंबर टाईप केल्यानंतर शोधा या बटणावर क्लिक करा.
- आपला योग्य गट नंबर निवडा कारण काही गटांमध्ये अ, ब, क किंवा एक, दोन, तीन असे पर्याय असतात.
- सातबारा उतारा ऑनलाइन नोंदणीसाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर टाईप करा.
- कॅपच्या तंतोतंत बरोबर टाईप करा व Verify captcha to view 7/12 वर क्लिक करा.
- गाव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक) व गाव नमुना 12 (पिकांची नोंदवही) म्हणजेच mahabhulekh सातबारा(7/12) आपल्यासमोर आहे.
- या वेबसाईटवर दर्शविलेली ऑनलाइन माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.
- कायदेशीर अथवा शासकीय बाबींसाठी वापरण्यासाठी सातबारा उतारा महाभुमी वेबसाईट digitalsatbara.mahabhumi.gov.in वर मिळेल.
Read Also: जमिनीचा सातबारा बंद होणार? नेमका शासन निर्णय काय?
डिजिटल स्वाक्षरीत 7/12, 8A, फेरफार और प्रॉपर्टी कार्ड मालमत्ता पत्रक कैसे देखें?
8अ उतारा जमाबंदी पत्रक ऑनलाइन बघा
- ऑनलाइन 8 अ उतारा पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
- विभाग निवडा (अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे)
- विभाग निवडल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडा.
- खाता नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव, संपूर्ण नाव यापैकी कोणत्याही एका ची निवड करा.
- आठ अ नोंदणीसाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर लिहा व 8अ पहा या टॅबवर क्लिक करा.
- कॅपच्या तंतोतंत बरोबर टाईप करा व Verify captcha to view 8A वर क्लिक करा.
- गाव नमुना आठ-अ धारण जमिनींची नोंदवही (कृषिक) आसामीवार–खतावणी जमाबंदी पत्रक आपल्यासमोर आहे.
- या वेबसाईटवर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.
- कायदेशीर अथवा शासकीय बाबींसाठी वापरण्यासाठी 8 अ उतारा महाभुमी वेबसाईटवर मिळेल.
मालमत्ता पत्रक (Property Card) ऑनलाईन पाहणे
- मालमत्ता पत्रक ऑनलाइन पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
- Online property card साठी विभाग निवडा (अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे)
- विभाग निवडल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडा.
- CTS No. /न. भु.क्र, पहिले नाव, मधील नाव, आडनाव व नाव शोधा यापैकी कोणत्याही एका ची निवड करा.
- मालमत्ता पत्रक ऑनलाइन पाण्यासाठी आपला मोबाईल नंबर व कॅपच्या टाईप करा.
- महाराष्ट्र जमीन महसूल( गाव, नगर व शहर भूमापन) नियम, 1969 यातील नियम 7 नमुना “ड” म्हणजेच मालमत्ता पत्रक आपल्यासमोर आहे.
डिजिटल स्वाक्षरीत 7/12, 8A, फेरफार, मालमत्ता पत्रक पहा- digitalsatbara.mahabhumi.gov.in
डिजिटल सातबारा महाभूमी पोर्टलवरून आपण ✔️ डिजिटल स्वाक्षरी केलेले 7 12 8a e ferfar Utara आणि प्रॉपर्टी कार्ड/मालमत्ता पत्रक काढू शकतो. आपण फक्त महाभुलेख महाभूमी पोर्टलवरून माहिती मिळवू शकतो. डिजिटल 7 12 महाभूमीच्या माध्यमातून आपण डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्रे डाउनलोड करू शकतो. डिजिटल स्वाक्षरी केलेले 7/12, 8A आणि प्रॉपर्टी कार्ड सर्व सरकारी आणि कायदेशीर बाबींसाठी वापरता येतील.
Digital 7 12, Digitalsatbara.Mahabhumi पोर्टल वर लॉगिन
Digital satbara.Mahabhumi पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा:
Digitally signed 7 12: Login – Mahabhumi
डिजीटल स्वाक्षरी केलेले 7 12, 8A प्रॉपर्टी कार्ड मिळविण्यासाठी, प्रथम digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर लॉग इन करा.
डिजिटल सातबारा महाभूमी पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
New User Registration ↗️ करण्यासाठी येथे क्लिक करा.
नवीन वापरकर्ता नोंदणी करण्यासाठी, आपण वैयक्तिक माहिती, पत्ता माहिती, लॉगिन संबंधित आयडी आणि पासवर्ड निश्चित करा. लॉगिन आयडी व पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवा.
Digitally signed property card, 7/12, 8A, फेरफार उतारा मिळविण्यासाठी, तुम्हाला महाभुलेख, महसूल विभाग, महाराष्ट्र शासनाकडे पेमेंट करावे लागेल.
तुम्हाला तुमचे खाते डिजिटलसातबारा महाभूमी पोर्टलवर रिचार्ज करावे लागेल.
मोबाईल रिचार्जप्रमाणेच हे खाते बँक खाते, क्रेडिट कार्ड, UPI ऑनलाइन पेमेंट पद्धतीने सहज रिचार्ज केले जाऊ शकते.
विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा- Mahabhulekh mahabhumi.gov.in.
ULPIN क्रमांक माहित असल्यास डिजिटल स्वाक्षरीत सातबारा कसा डाऊनलोड करावा
ULPIN म्हणजे Unique Land Parcel Identification Number आपल्या जमिनीचा विशिष्ट ओळख क्रमांक. थोडक्यात आपल्या जमिनीचा आधार क्रमांक.
प्रत्येक जमिनीचा ULPIN क्रमांक ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक वर नमूद केलेला असतो किंवा क्यूआर कोड च्या खाली लिहिलेला असतो.
- सर्वप्रथम Digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर लॉगिन करा.
- Do you Know ULPIN (आपल्याला युलपिन क्रमांक माहिती आहे का ? ) : समोरील बॉक्स मध्ये बरोबरची खून नोंद करा व ULPIN क्रमांक अचूक लिहून व्हेरिफाय करा.
- डिस्ट्रिक्ट, तालुका, व्हिलेज, सर्वे नंबर कन्फर्म करा.
- डाउनलोड बटन दाबा आणि डिजिटल सातबारा डाऊनलोड करा.
- पंधरा रुपये महसूल विभागाला प्राप्त झाल्यावर डिजिटल सातबारा ऑनलाइन सातबारा आपण सहज डाऊनलोड करू शकता.
- डिजिटल ऑनलाइन सातबारा डाउनलोड केले गेले नाही तर आपण पेमेंट हिस्टरी वर जाऊन डाऊनलोड करू शकता.
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ – DIGITAL SIGNATURE 7 12 कसे पहावे व डाऊनलोड करावे ?
- Digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर लॉगिन करा.
- जिल्हा, तालुका, गाव, सर्वे नंबर/ गट नंबर (Survey No./Gat No.) निवडा.
- डिजिटल स्वाक्षरीत 7/12 (digitally signed 7 12) मिळविण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासन महसूल विभागाला ₹ 15 भरावे लागतील.
- डाउनलोड बटण दाबा आणि डिजिटल ESign 7/12 डाउनलोड करा.
- ऑनलाइन 7 12 डाउनलोड केले गेले नाही, नंतर पेमेंट इतिहास पर्यायावर जा आणि ते डाउनलोड करा.
- डिजिटल स्वाक्षरीत 7/12 (digital satbara) सर्व अधिकृत आणि कायदेशीर कारणांसाठी वापरला जाऊ शकतो.
डिजिटल स्वाक्षरीत ८अ – DIGITALLY SIGNED 8A कसे पहावे व डाऊनलोड करावे ?
- Digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर लॉगिन करा.
- जिल्हा, तालुका, गाव निवडा.
- 8A खाते क्रमांक किंवा नाव निवडा.
- आडनावाची निवड योग्य असेल, आडनाव लिहिल्यानंतर आपले नाव निवडा.
- तुमच्या नावासोबत तुमचा खाते क्रमांक देखील येथे दिसेल.
- डिजिटल स्वाक्षरीत 8अ (Digitally signed 8A) मिळविण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र शासन महसूल विभाग Mahabhulekh यांना ₹ 15 भरावे लागतील.
- डाउनलोड बटण दाबा आणि डिजिटल Esign 8अ डाउनलोड करा.
- Digitally eSigned 8A डाउनलोड केले गेले नाही तर पेमेंट हिस्ट्री या ऑप्शन वर जा व तेथून डाऊनलोड करा.
- हे खाता अभिलेख 7/12 डिजिटली स्वाक्षरी केलेल्या डेटावर आधारित आहे, त्यामुळे स्वाक्षरी आवश्यक नाही.
- मालमत्ता पत्रक – डिजिटल स्वाक्षरी केलेला 8A सर्व अधिकृत आणि कायदेशीर हेतूंसाठी वापरला जाऊ शकतो.
डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड – DIGITALLY SIGNED PROPERTY CARD कसे पहावे व डाऊनलोड करावे ?
मालमत्ता पत्रक डिजिटल साइन प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी Digitalsatbara.Mahabhumi पोर्टलवर लॉग इन करा.
विभाग(Region),जिला(District), कार्यालय(Office), गांव(Village) सी.टी.एस नंबर. (CTS No.) निवडा.
डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड (Digitally signed property card) मिळविण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाला ₹ 45 भरावे लागतील. (हे पेमेंट ₹ 90, नागरी विभागात ₹ 135 असू शकते)
डाउनलोड बटण दाबा आणि डिजिटल ईसाइन प्रॉपर्टी कार्ड / esigned property card डाउनलोड करा.
Digitally eSigned property card डाउनलोड केले गेले नाही तर पेमेंट हिस्ट्री या ऑप्शन वर जा व तेथून डाऊनलोड करा.
डिजिटल स्वाक्षरी केलेले प्रॉपर्टी कार्ड/मालमत्ता पत्रकचा वापर सर्व अधिकृत आणि कायदेशीर हेतूंसाठी केला जाऊ शकतो.
डिजिटल स्वाक्षरीत फेरफार उतारा – DIGITALLY SIGNED Online e FERFAR कसे पहावे व डाऊनलोड करावे ?
- स्वाक्षरीत फेरफार उतारा/signed eFerfar प्राप्त करण्यासाठी Digital satbara.Mahabhumi पोर्टलवर लॉग इन करा.
- जिल्हा, तालुका, गाव, फेरफार नंबर (Mutation No.) निवडा.
- डिजिटल स्वाक्षरीत फेरफार (Digitally signed 7/12) मिळविण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र शासन महसूल विभागाला ₹ 15 भरावे लागतील.
- डाउनलोड बटण दाबा आणि डिजिटल ईसाइन फेरफार डाउनलोड करा.
- ई-फेरफार डाऊनलोड केले गेले नाही तर पेमेंट हिस्ट्री या ऑप्शन वर जा व तेथून डाऊनलोड करा.
महाभुलेख सातबारा उतारा साठी शासकीय वेबसाईट लिंक
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाची लिंक खालीलप्रमाणे आहेत.
महाराष्ट्रातील महसूल विभाग व त्या अंतर्गत येणारे जिल्हे:
महसूल विभाग | विभाग अंतर्गत येणारे जिल्हे | |
1 | अमरावती विभाग: | अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम |
2 | औरंगाबाद विभाग: | उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली |
3 | कोंकण विभाग: | ठाणे, पालघर, मंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग |
4 | नागपुर विभाग: | गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा |
5 | नाशिक विभाग: | अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक |
6 | पुणे विभाग: | कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर |
FAQs:
कुणासाठीही Online Satbara बघणे झाले आहे अगदी सोपे.
सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in साईट ओपन करा.
ऑनलाईन सातबारा बघण्यासाठी अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे यापैकी योग्य विभाग निवडा.
यानंतर आपला जिल्हा तालुका व गावाची निवड करा.
तुमच्या जमिनीचा सर्वे नंबर/ गट नंबर/ नाव लिहा.
तुमचा मोबाईल नंबर लिहा व व्हेरिफिकेशन कैप्चा टाईप करा.
आपला ऑनलाईन सातबारा Maha abhilekh आपल्यासमोर आहे.
Digitally Signed 7/12 मिळविण्यासाठी कृपया खालील चरणांचे अनुसरण करा:
Step 1. डिजिटल सातबारा महाभूमि पोर्टल https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ वर जा.
Step 2. Digitally Signed 7/12 टॅबवर क्लिक करा.
Step 3. ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा
Step 4. तालुका निवडा
Step 5. गाव निवडा
Step 6. सर्वे नंबर / गट नंबर शोधा
Step 7. सर्वे नंबर / गट नंबर निवडा
Step 8. डाउनलोड बटन वर क्लिक करा
Step 9. Digital 7/12 फाइल डाउनलोड केल्यानंतर, PNR मधून ₹ 15 कापले जातील.
डिजिटल स्वाक्षरीत 8अ Digitally Signed 8A मिळविण्यासाठी कृपया खालील चरणांचे अनुसरण करा:
Step 1. डिजिटल सातबारा महाभूमि पोर्टल https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ वर जा.
Step 2. Digitally Signed 8A टॅब वर क्लिक अथवा टच करा.
Step 3. जिल्हा निवडा
Step 4. तालुका निवडा
Step 5. गाव निवडा
Step 6. खाता संख्या लिहा
Step 7. डाउनलोड बटन वर क्लिक करा
Step 8. Digitally Signed 8A फाइल डाउनलोड केल्यानंतर, PNR मधून ₹15 कापले जातील.
डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड/Digitally signed property card मालमत्ता पत्रक मिळविण्यासाठी कृपया खालील चरणांचे अनुसरण करा:
Step 1. डिजिटल सातबारा महाभूमि पोर्टल https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ वर जा.
Step 2. Digitally Signed Property card टॅब वर क्लिक अथवा टच करा.
Step 3. विभाग निवडा
Step 4. जिल्हा निवडा
Step 5. कार्यालय निवडा
Step 6. गाव निवडा
Step 7. CTS नंबर लिहा
Step 8. CTS नंबर निवडा
Step 9. डाउनलोड बटनावर क्लिक अथवा टच करा
Step 10. Digitally Signed 8A फाइल डाउनलोड केल्यानंतर, PNR मधून ₹45 चे पेमेंट वजा केले जाईल.
Step 11. प्रॉपर्टी कार्ड / मालमत्ता पत्रक संबंधित भुगतान शहरी जगहों पर अलग अलग हो सकता है (₹45, ₹90, ₹135)
काही वेळा अचानकपणे भूलेख वेबसाईटवर वापरकर्त्यांची मर्यादा जास्त झाल्यामुळे सर्वर डाऊन होते अथवा काम करत नाही.
अशावेळी एक तर थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा किंवा डिजिटल सातबारा महाभुमी वेबसाईटवर सातबारा, मालमत्ता पत्रक, फेरफार ही कागदपत्रे आपण काही नाम मात्र पैसे देऊन काढू शकतो.
ULPIN क्रमांक म्हणजे Unique Land Parcel Identification Number आपल्या जमिनीचा विशिष्ट ओळख क्रमांक. थोडक्यात आपल्या जमिनीचा आधार क्रमांक.
प्रत्येक जमिनीचा ULPIN क्रमांक ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक वर नमूद केलेला असतो किंवा क्यूआर कोड च्या खाली लिहिलेला असतो.
महाभुलेख साईट कायम बंद असते. नेहमी सर्वर बंद असते.
ओव्हरलोड मुळे भुमी अभिलेख वेबसाइट काही काळ बंद होती. भूलेख वेबसाइट सध्या सुरळीत सुरू आहे.
ऑनलाईन सातबारा खरंच बंद होणार आहे का?
Whenever we are searching, it seem like website not working.
ankush shankar gujar was submitted application i.e. varsa hakka in the year 2015 and 2018 but not change in the name up till now even I fill up two times form in the talati office THEN WHY NOT CHANGE THE NAME IN THE VARSA HAKKA .
MOB.NO.9619940399/8928529315