Contents
जमिनीच्या नोंदणीसाठी सातबारा उतारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. मात्र आता हा सातबारा कालबाह्य होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड चा आधार मालकी ठरवण्यासाठी होणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचा 7/12 बंद विषयी नेमका निर्णय काय?
सातबारा उतारा ऐवजी केवळ प्रॉपर्टी कार्ड
जमिनीचा सातबारा बंद होणार. जमिनीच्या सातबारा उतारा ऐवजी केवळ प्रॉपर्टी कार्ड राहणार. नाशिक, मिरज, सांगलीत अंमलबजावणी सुरू.
शहरी भागामध्ये शेतीसाठी उपयुक्त शेत जमीन शिल्लक राहिली नाही. त्यामुळे शहरी भागामध्ये सातबारा ची गरज राहिली नाही .सातबारा बंद हा शासन निर्णय फक्त शहरांसाठी लागू असेल. ज्या ठिकाणी सिटीसर्वे पूर्ण झाले आहेत त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड, मालमत्ता पत्रक दिले गेले आहेत किंवा देण्यात येणार आहेत.
सातबारा बंद ची अंमलबजावणी कुठे व कशी?
सध्यातरी 2022 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुण्यातील हवेली तालुक्यात व नाशिक, मिरज, सांगलीत ही पद्धत राबविण्यात येत आहे. जमिनीचा 7/12 बंद करून मालमत्ता पत्रक प्रॉपर्टी कार्ड देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ही मोहीम राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Read Also: आपल्या जमिनीचा सातबारा कसा पहावा?
महाभुलेख 7/12 उतारा व 8 अ मालमत्ता पत्रक ऑनलाइन पहा bhulekh.mahabhumi.gov.in
शहरी भागात जमिनीच्या सातबारा उतारा मध्ये फेरफार करून जमिनीच्या मालकी संबंधी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे ज्या जमिनीचा वापर शेतीसाठी होत नाही त्या जमिनीचा सातबारा बंद करण्याची प्रक्रिया भुमिअभिलेख विभागाने सुरू केली आहे.
शहरी भागातील जमिनींचा उपयोग जर शेतीसाठी होत नसेल तर त्या जमिनीचा सातबारा उतारा बंद होणार आहे.
Property Card madhe fasavnuk hovu shakat nahi ka?